

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी नारायणगाव येथे गुरूवार(दि.२६) पासून साखळी उपोषण सुरु करण्यात झाले आहे. नारायणगाव येथील पुर्ववेशीजवळ असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला प्रथम हार अर्पण करण्यात आला. यावेळी अमित बेनके,माऊलीशेठ खंडागळे,प्रमोद खांडगे पाटील ,अनिल गावडे योगेश तोडकर,अमित डोंगरे,मुकुंद डोंगरे,सचिन थोरवे,सुनील पवार , माजी सैनिक विलास खंडागळे ,सुभाष खंडागळे ,सुनील मुळे,हर्षल गावडे,शरद खंडागळे, विकास थोरात ,अनिलशेठ नेहरकर श्रीपाद मुळे, खोडद माजी सरपंच आदी उपस्थित होते.
मराठा समाजावर सरकार अन्याय करीत असून दिलेला शब्द पळला जात नाही. आता आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही. प्रसंगी रस्त्यावर उतरू असा इशारा अमित बेनके यांनी दिला. यावेळी माऊली खंडागळे, सविता गायकवाड, प्रमोद खांडगे, सचिन थोरवे आदींनी आपले विचार माडले. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत साखळी उपोषण सुरूच राहणार असल्याचे अनिल गावडे यांनी सांगितले.
हेही वाचा :