Jalgaon Murder : तब्बल 24 वर्षांनी घेतला वडिलांच्या खूनाचा बदला, दोघांना अटक | पुढारी

Jalgaon Murder : तब्बल 24 वर्षांनी घेतला वडिलांच्या खूनाचा बदला, दोघांना अटक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा ;  1999 मध्ये वडिलांचा खून करणाऱ्याचा तब्बल 24 वर्षांनी मुलाने बदला घेतला आहे. मुलाने व त्याच्याबरोबर असलेल्या एका साथीदाराने लोखंडी पायपाने डोक्यात मारून संबधिताचा खून केला आहे. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

भुसावळ येथील गवळीवाडा येथे राहणारे दस्तगीर गफुर गवळी यांचा 1999 रोजी मयत दिलीप रामलाल जोनवल यांनी खून केला होता.  त्यांच्या मुलाने याचा गेल्या अनेक वर्षांपासून मनात राग धरून ठेवला होता. (दि. 25) च्या रात्री दिलीप जोंनवाल हा अकलूज येथून जेवण करून घरी येत असताना भुसावळ शहरातील गरुड प्लॉट भागातील क्रांती चौकात आला असता संशयित आरोपी आदिल दस्तगीर खाटीक व साजिद सगीर खाटीक दोन्ही राहणार गवळीवाडा यांनी लोखंडी पाईपाने डोक्यात व हातावर मारहाण करून जखमी केले. यात दिलीप जोनवाल यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी संग्राम जोनवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी दोन्ही संशयित आरोपींना भुसावळ शहर पोलीसांनी ताब्यात घेतलेले आहे.

हेही वाचा :

Back to top button