Pune Accident : इंदापूरच्या बाह्य वळणावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू | पुढारी

Pune Accident : इंदापूरच्या बाह्य वळणावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

इंदापूर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर शहराच्या बाह्यवळणावर भीषण अपघात झाला असून एका भरधाव ट्रकने एका दुचाकी स्वरास चिरडल्याची घटना घडली आहे. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. दशरथ मारुती चोरमले असे मयत दुचाकीस्वाराचे नांव असून तो इंदापूर नजीक असणा-या काळके वस्ती गलांडवाडी नंबर एक येथील रहिवासी आहे.

महामार्गांवरिल दुर्गेश्वरी हाॅटेल समोर हा अपघात घडला आहे.असून संतप्त जमावाने हा ट्रक पेटवून दिला आहे.एम.एच.३२ ए.जे.९२७३ या क्रमांकाचा ट्रक सोलापूर कडून पुण्याच्या दिशेने निघाला होता.या दरम्यान एम.एच.४२ सी. ५६०४ या दुचाकीवरील दशरथ मारुती चोरमले हे दूध विक्री करुन घरी निघाले असता त्यांना या ट्रकने चिरडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

जमावाने ट्रक पेटवला

संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला असून या दरम्यान पेटवलेला ट्रक विझवण्याचा प्रयत्न करताना इंदापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस शिपाई अर्जुन नरळे यांना किरकोळ भाजल्याची माहिती मिळत आहे. इंदापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. इंदापूर नगर परिषदेच्या अग्निशामकच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली आहे.

हेही वाचा

Asian Para Games: बॅडमिंटन मिश्र दुहेरीत भारताचे पदक निश्‍चित, प्रमोद-मनीषाची उपांत्‍य फेरीत धडक

उसाला 5 हजार रुपये भाव द्या, अंतराची अट रद्द करा

Nagar Accident : कंटेनर-कारचा भीषण अपघात; दोघे ठार

 

Back to top button