Pune Water issue : पुणेकरांसाठी महत्वाचं! शहरातील 'या' भागातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद | पुढारी

Pune Water issue : पुणेकरांसाठी महत्वाचं! शहरातील 'या' भागातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद

पुणे; पुढारी वृत्तसेवा : वारजे जलशुद्धीकरण केंद्रांतर्गत येणार्‍या एसएनडीटी, चतु:शृंगी, तळजाई आणि लष्कर जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणार्‍या जलवाहिनीच्या दुरुस्तीची कामे येत्या गुरुवारी (दि.26) करण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरुवारी जवळपास अर्ध्याहून अधिक शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग

वारजे जलशुद्धीकरण केंद्र – वैदूवाडी, मॉफको परिसर, आशानगर, बहिरटवाडी, शिवाजी हौसिंग सोसायटी, चतु:शृंगी मंदिर परिसर, पत्रकारनगर, नीलज्योती, म्हाडा वसाहत, गोखलेनगर, कुसाळकर पुतळा चौक, जनवाडी, पीएमसी कॉलनी, लाल चाळ, हिरवी चाळ, भोसलेनगर, खरेवाडी, सिंचननगर, आयसीएस कॉलनी, लॉ कॉलेज रोड, बीएमसीसी रोड, गणेशवाडी, भांडारकर रस्ता आणि प्रभात रोड, वडारवाडी, दीप बंगला चौक परिसर, मॉर्डन कॉलेज परिसर, घोले रोड परिसर फर्ग्युसन रस्ता, शिरोळे रस्ता, मॉडेल कॉलनी, हनुमाननगर, शिवाजीनगर पोलिस लाइन, रेव्हेन्यू कॉलनी, विश्रामबाग सोसायटी, रामोशीवाडी, हॅपी कॉलनी गल्ली क्र. 4, नवीन शिवणे, अमर सोसायटी, कांचन गल्ली, अशोक पथ, लिमये पथ, गुलमोहर पथ, रामबाग कॉलनी, मोहोळ चौक, मोरे विद्यालय, हनुमाननगर, केळेवाडी, रामबाग कॉलनी परिसर, एमआयटी कॉलेज परिसर, एल.आय.सी. कॉलनी, माधव बाग, मॉर्डन कॉलनी, जय भवानी नगर, शिवतीर्थ नगर, पौड रस्ता, किष्किंधानगर, सुतारदरा, म्हातोबा नगर, आझाद, बाडी, बनाज कंपनी मागील भाग, वडारवस्ती, वनदेवी समोरचा संपूर्ण परिसर, कोथरूड गावठाण, डहाणूकर कॉलनी, आयडियल कॉलनी, गुजरात कॉलनी.

चतु:शृंगी टाकी परिसर : सकाळनगर, औंध रोड, आयटीआय रस्ता, औंध गाव आणि बाणेर रस्ता, पंचवटी, पाषाण, निम्हण मळा भाग, लमाणतांडा वस्ती, पाषाण गावठाण राजभवन, भोसले नगर, पुणे विद्यापीठ, स्पायसर कॉलेज परिसर
पुणे कॅन्टोन्मेंट जलशुद्धीकरण केंद्र : खराडी गावठाण, चंदननगर परिसर, गणेशनगर, आनंद पार्क, मते नगर, माळवाडी, सोमनाथ नगर, बॉम्बे सॅपर्स, राम टेकडी व हडपसर इंडस्ट्रीयल भाग, ससाणे नगर, मुंढवागाव, काळेपडळ, काळेबोराटे नगर, मगरपट्टा सिटी, केशवनगर, महंमदवाडी, गांधळेनगर, माळवाडी परिसर.
तळजाई झोन अखत्यारीतील परिसर : संभाजीनगर, बालाजीनगर, तळजाई वसाहत, लोअर इंदिरानगर, अप्पर इंदिरानगर, लेक टाऊन परिसर आणि बिबवेवाडीच्या काही भागांतील पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे.

हेही वाचा

Cold weather : ’तेज’ने बाष्प ओढले; राज्यात थंडीची चाहूल

अनुकंपाच्या नोकरीसाठी दोन बहिणींची विष पाजून हत्या

मार्ग मोकळा! पिंपरी ते निगडी मेट्रो लवकरच धावणार

Back to top button