Pimpri News : पालिकेची बिघडलेली घडी पुन्हा बसवायची : अजित पवार | पुढारी

Pimpri News : पालिकेची बिघडलेली घडी पुन्हा बसवायची : अजित पवार

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेत अलिकडच्या काळात निविदेत रिंग झाली. वाढीव दराने कामे करून नागरिकांच्या कररूपी पैसे चुकीच्या पद्धतीने खर्च केले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. विकासाचे रोल मॉडेल ठरलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची बिघडलेली घडी बसवायची आहे. त्यासाठी सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि.20) केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घेण्यात आलेल्या गणेश मंडळांच्या गणेश सजावट तसेच, घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण आकुर्डी येथील ग. दी. माडगूळकर नाट्यगृह येथे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, माजी नगरसेवक राजू मिसाळ, नाना काटे, मोरेश्वर भोडवे, राहुल भोसले, शाम लांडे, पंकज भालेराव, जगदीश शेट्टी, विनायक रणसुभे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, शहराचा पूर्वीचा श्रीमंत असा नावलौकीक पुन्हा मिळवून द्यायचा आहे. शहर झोपडपट्टी मुक्त करायचे आहे. त्यासाठी एसआरए योजना राबविल्या जातील. शहराचे हित लक्षात घेऊन काम करा. पक्षात नवीन कार्यकर्ते कसे येतील, याचा प्रयत्न करा. तुमच्यामध्ये कोणाचे खटके उडत असतील, तर एकत्रित येऊन सोडवा. आपल्या भागातील रखडलेल्या कामांना गती देण्यासाठी पदाधिकार्यांनी लक्ष द्यावे. त्यासाठी 15 दिवसांत एकदा महापालिका आयुक्तांसमवेत बैठक घेऊन कामांचा आढावा घेत आहे. अजित गव्हाणे यांनी स्वागत केले. भाऊसाहेब कोकाटे यांनी सुत्रसंचालन केले. विनायक रणसुभे यांनी आभार मानले.

शहरात येऊन काही मंडळी वातावरण दूषित करीत आहेत

काही मंडळी अधून मधून शहरात येऊन वेगळ्या प्रकाराचे वातावरण निर्माण करण्याचे काम करीत आहेत. ही बाब पक्षाच्या पदाधिकार्यांना माहिती आहे. स्वर्गीय प्रा. रामकृष्ण मोरे यांच्यानंतर मी शहराच्या विकास गती दिली, असे सांगत अजित पवार यांनी खासदार शरद पवार व आ. रोहित पवार यांचे नाव घेता त्यांच्यावर टीका केली.

हेही वाचा

Pimpri News : पालिकेच्या 20 विभागांचे कामकाज आता जीएसआय प्रणालीनुसार

Nashik Murder : वडाळी नजीकच्या बेपत्ता तरुणाचा खून झाल्याचे उघड

Pune News : बेट भागातील फ्युज पेट्या धोकादायक

Back to top button