

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या 20 विभागांच्या दैनंदिन कामकाजासाठी जीआयएस कार्यप्रणाली सुरू करण्यात आली आहे. या कार्यप्रणालीनुसार यापुढे महापालिकेचे कामकाज चालणार आहे. या प्रणालीचा वापर करणारी पिंपरी-चिंचवड महापालिका देशातील पहिली महापालिका आहे, असे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.
स्थापत्य, आपत्ती व्यवस्थापन, शिक्षण, विद्युत, पर्यावरण अभियांत्रिकी, अग्निशमन, उद्यान, आरोग्य, भूमी आणि जिंदगी, वैद्यकीय, करसंकलन, समाजविकास, ड्रेनेज, आकाशचिन्ह व परवाना, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन, क्रीडा, अणुविद्युत व दूरसंचार, नगररचना, पशुवैद्यकीय, पाणीपुरवठा या विभागांसाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे.
महापालिकेच्या विभागांच्या अंतर्गत प्रशासन कार्यक्षमतेत सुधारणा करणे. नागरिकांसाठी ऑनलाइन सेवा सुलभ होण्याच्या दृष्टीने महापालिका व स्मार्ट सिटीद्वारे जीआयएस प्रणाली हाती घेण्यात आली आहे.
देशातील पहिलाच प्रकल्प आहे. पारदर्शक प्रशासन व नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी ही प्रणाली कार्यरत करण्यात आली आहे.
संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचार्यांना निर्णय घेणे सोपे होणार आहे. कामकाजाला गती मिळणार आहे, असे महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.
हेही वाचा