Prithviraj Chavan : ड्रग्ज प्रकरणाची जबाबदारी गृहमंत्र्यांची : पृथ्वीराज चव्हाण | पुढारी

Prithviraj Chavan : ड्रग्ज प्रकरणाची जबाबदारी गृहमंत्र्यांची : पृथ्वीराज चव्हाण

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची बाब गंभीर आहे. ससून प्रकरणात अनेक मंत्र्यांची नावे येत आहेत. पण या प्रकरणातील सगळं समोर येईल की दडपलं जाईल, माहीत नाही. ससूनमधून ड्रग्ज माफिया फरार होतो, हे गृहखात्याचे अपयश आहे. गृहमंत्र्यांनी या सर्व प्रकरणाची जबाबदारी घ्यावी, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

पुण्यामध्ये गुरुवारी (दि. 19) त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्या वेळी त्यांनी हे मत व्यक्त केले. चव्हाण म्हणाले, ‘महाविकास आघाडी एकत्रितपणेच लढणार आहे. राज्यात आमची तीन पक्षांची आघाडी आहे. महाविकास आघाडी राज्यातील जागावाटप एकत्र बसवून ठरवेल. जागा वाटपाचा प्रश्न सामंजस्याने सोडवू,’ असे सांगतानाच लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी परत आले तर राज्यात विधानसभा निवडणूकच होणार नाही, असे ते म्हणाले.

हेही वाचा

पर्यावरणस्नेही वाहनांची निर्मिती व्हावी!

पाणी नियोजनाचा उपमुख्यमंत्री आज घेणार आढावा

राज्यातील 42 तालुके दुष्काळग्रस्त! तीव्रता तपासणार

Back to top button