

पुणे; पुढारी वृत्तसेवा : यंदा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील पानशेत आणि वरसगाव ही प्रमुख धरणेच 100 टक्के भरली आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी होणार्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत शहराच्या पाण्याचा निर्णय होणार आहे. त्यामुळे आजच्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
महापालिकेला महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या (एमडब्ल्यूआरआरए) नियमाचा दाखला देत जलसंपदा विभागाने 12.82 टीएमसी पाणी मंजूर केले आहे. त्यापेक्षा जास्त पाणी वापरल्यास दंड आकारण्याचा इशाराही दिला आहे. या पार्श्वभूमीवर कालवा समितीची बैठक होत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधार्यांना शहर
आणि ग्रामीण भागाला समान पाणीवाटप करताना कसरत करावी लागणार आहे.
हेही वाचा