

पुणे : राज्यातील कोकणसह मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पुढील दोन दिवस हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने याबाबत अंदाज वर्तविला आहे. अरबी समुद्राच्या वायव्य भागावर असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर 24 तासांत तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होणार आहे. त्यानंतर हा पट्टा 21 ऑक्टोबरला मध्य-पूर्व अरबी समुद्राकडे सरकणार आहे.
त्यामुळे कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत पाऊस पडणार आहे. दरम्यान, राज्याच्या उर्वरित भागात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम आहे. गुरुवारी सोलापूरचे कमाल तापमान 36.4 अंश नोंदविले गेले. राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद सोलापूरमध्ये झाली.
हेही वाचा