Pune Crime News : पकडलेल्या आरोपीतील एकजण बॉम्बस्फोट करणारा बांगलादेशी | पुढारी

Pune Crime News : पकडलेल्या आरोपीतील एकजण बॉम्बस्फोट करणारा बांगलादेशी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : हडपसर पोलिसांनी पकडलेल्या चार बांगलादेशींपैकी पकडण्यात आलेला एक बांगलादेशी घुसखोर हा बांगलादेशात बॉम्बस्फोट घडवून आणणारा आरोपी असल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. लष्कर न्यायालयाने 5 अटक आरोपींना 23 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

कमरून रोशन मंडल (28, रा. आंबामाता मंदिर, फुरसुंगी) असे बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या बांगलादेशी घुसखोराचे नावे आहे. त्याने त्याचा बांगलादेश येथील साथीदार तारीकुल इस्लाम याच्या मदतीने बांगलादेशातील बेनापोल डिग्रीसमोरील रस्त्यावर बॉम्ब टाकला होता. जामिनावर सुटल्यानंतर तो 2019 पासून भारतात वास्तव्य करीत होता. बेकायदेशीरपणे वास्तव्य करणारे साथीदार निजाम रहिमअली शेख, बाबू मोहसीन मंडल, सागर आलम शेख तसेच उत्तर प्रदेशातील शंकर उर्फ संग्राम नोकरामसिंग पवार यांना हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या होता. गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक संदीप शिवले करीत आहेत.

एजंटकडून ‘भारतीय’ म्हणून ओळख

आरोपींना आधार, पॅन कार्डसारखी भारतीय ओळखपत्रे मिळवून देणारा पुण्यातील एजंट तपासात पोलिसांना सापडला आहे. पोलिसांनी ‘एजंट’कडूनही बांगलादेशी पासपोर्ट जप्त केले आहेत.

हेही वाचा

स्वप्नवत प्रवासाला मिळणार चालना!

Israel-Hamas war : बायडेन यांच्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक इस्रायलमध्ये दाखल

Pune Police News : पोलिसांसाठी पुण्यात होणार 22 मजली इमारती

Back to top button