Lalit Patil Drugs Case : ड्रग्ज प्रकरणी पुणे पोलिस अ‍ॅक्शन मोडवर! ललितच्या २ मैत्रिणींना केली अटक | पुढारी

Lalit Patil Drugs Case : ड्रग्ज प्रकरणी पुणे पोलिस अ‍ॅक्शन मोडवर! ललितच्या २ मैत्रिणींना केली अटक

पुढारी ऑनलाईन डेस्क : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी मुंबई पोलिसांच्या कारवाईनंतर आता पुणे पोलिसदेखील अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. पुणे पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणी बुधवारी रात्री नाशिक येथून दोन महिलांना अटक केली आहे. या दोन महिला ललित पाटीलच्या मैत्रिणी असल्याची प्राथमिक माहिती सामोर येत आहे. प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम अशी या दोघींची नावं आहेत. दोन्ही महिलांना पुण्यात आणण्यात आले असून दुपारी पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

दरम्यान, ललित पाटीलने ससून रुग्णालयातून पळून जाण्यासाठी या दोन महिलांची मदत घेतल्याचा संशय पोलिसांना आहे. रुग्णालयातून पलायन केल्यानंतरही या दोन महिला ललित पाटीलच्या संपर्कात होत्या. नाशिकमध्ये त्याची राहण्याची सोयदेखील या दोघींने केली होती. ललित पाटील फरार झाल्यानंतर त्याने कमावलेला काळा पैसाही या दोघींकडे ठेवायला दिला होता. या दोन्ही महिलांना पुणे पोलिस आज न्यायालयात हजर करणार आहेत.

पुण्यातून थेट नाशिकमध्ये…

पुण्यातील ससून रूग्णालयातून ड्रग्ज माफिया ललित पाटील फरार झाल्यानंतर थेट नाशिकला गेला. तिथे गेल्यानंतर तो प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम या दोन्ही मैत्रिणीला भेटून त्याने कमावलेला काळा पैसा या दोघींकडे ठेवायला दिला. ललित पाटीलच्या घरात टाकलेल्या छापेमारीत पोलिसांना ३ किलो सोने सापडले होते. पाटीलकडे आणखी पाच किलो सोनं असून या दोघींकडे सापडण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

हेही वाचा

Nashik Municipal Corporation : तिसऱ्या हप्त्यासाठी वेतन राखीव निधी मोडणार

धुळे : भावी लेफ्टनंट कर्नलचा प्रशिक्षणादरम्यान मृत्यू; सायगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शरद पवार सुप्रिया सुळेंना गाझाला पाठवतील : हिमंत सरमांचा पलटवार

Back to top button