Lalit Patil Drug Case : ससूनमध्ये असा घडला घटनाक्रम; घ्या जाणून? | पुढारी

Lalit Patil Drug Case : ससूनमध्ये असा घडला घटनाक्रम; घ्या जाणून?

पुणे : ड्रग्ज प्रकरणातील आरोपी ललित पाटील 2 ऑक्टोबर रोजी रात्री ससूनमधून पळून गेला. त्यानंतर ससूनमध्ये घडलेल्या घटनाक्रमातून दररोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. पाटीलला चेन्नईमधून अटक झाल्यानंतर पुन्हा अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

30 सप्टेंबर ः ससूनजवळ 2 कोटींचे अमली पदार्थ जप्त; दोघांना अटक.
1 ऑक्टोबर ः ड्रग्ज प्रकरणात ललित पाटीलचा सहभाग असल्याचे आणि तो ससूनमधून ड्रग रॅकेट चालवत असल्याचे उघड.
2 ऑक्टोबर ः ललित पाटील एक्स-रे काढण्याच्या निमित्ताने वॉर्डमधून बाहेर आला आणि रात्री आठच्या दरम्यान रुग्णालयातून पसार झाला.
3 ऑक्टोबर ः डीनकडून खुलासा नाही. वैद्यकीय संचालनालयाकडून डीन वगळता कोणीही टिपण्णी न करण्याच्या सूचना.
3 ऑक्टोबर ः वॉर्ड क्रमांक 16 मध्ये नऊ कैदी किरकोळ आजार असतानाही दोन ते नऊ महिने मुक्काम ठोकून असल्याचे वृत्त दै. ‘पुढारी’ने प्रसिध्द करत ससून प्रशासनाला दणका दिला.
4 ऑक्टोबर ः वॉर्डमधील कैद्यांबाबतचा अहवाल वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयास सादर.
5 ऑक्टोबर ः कैद्यांच्या वॉर्डसाठी नियमावली तयार करण्याचा ससूनचा निर्णय.
6 ऑक्टोबर ः विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून ससूनची झाडाझडती.अहवाल सादर करण्याचा आदेश.
7 ऑक्टोबर ः ससूनकडून विभागीय आयुक्तांना केवळ औषधसाठा, मनुष्यबळ अहवाल सादर; कैद्यांचा अहवाल सादर केलाच नाही.
8 ऑक्टोबर ः ‘पुढारी’च्या दणक्यानंतर नऊपैकी पाच कैद्यांची कारागृहात रवानगी.
9 ऑक्टोबर ः कैद्यांचा अहवाल केवळ न्यायालयात सादर करण्याचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्याकडून स्पष्ट.
10 ऑक्टोबर ः सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत मंत्री दादा भुसे यांनी ललित पाटीलसाठी फोन केल्याचा आरोप केला.
10 ऑक्टोबर ः दोषी डॉक्टरांवर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी आमदार रवींद्र धंगेकर यांची मागणी.
11 ऑक्टोबर ः ड्रग्ज प्रकरण चौकशीसाठी शासनातर्फे विशेष समिती स्थापन.
13 ऑक्टोबर ः पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून डीनची झाडाझडती.
14 ऑक्टोबर ः शासनाच्या समितीची ससूनला भेट; 80 जणांचे नोंदवले जबाब.
18 ऑक्टोबर ः ललित पाटील याला चेन्नईमधून अटक.

हेही वाचा

ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिसांचे हात बरबटलेले; आमदार रवींद्र धंगेकर यांचा आरोप

Crime News : पोलिस करत होते नौसैनिकाच्या मृत्यूचा तपास; तब्बल १९ वर्षांनंतर जिवंत सापडला

Crime News : पोलिस करत होते नौसैनिकाच्या मृत्यूचा तपास; तब्बल १९ वर्षांनंतर जिवंत सापडला

Back to top button