Crime News : पोलिस करत होते नौसैनिकाच्या मृत्यूचा तपास; तब्बल १९ वर्षांनंतर जिवंत सापडला | पुढारी

Crime News : पोलिस करत होते नौसैनिकाच्या मृत्यूचा तपास; तब्बल १९ वर्षांनंतर जिवंत सापडला

पुढारी ऑनलाईन डेस्क :  पानिपतचा रहिवासी असलेल्या एका व्यक्तीबद्दल धक्कादायक माहिती समोर येत आहे. २००४  मध्ये दिल्ली पोलिसांनी त्या व्यक्तीच्या मृत्यूची चौकशी सुरू केली होती. पोलीस इतकी वर्षे त्या व्यक्तीच्या मृत्यूचा तपास करत होते. तो तब्बल १९ वर्षांनंतर  जिवंत सापडला आहे.  या प्रकरणाचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. त्याने स्वतःला मृत घोषित करून मोठा कट रचला होता. आरोपी नौदलाचा माजी कर्मचारी आहे. जाणून घ्या काय आहे प्रकरण. (Crime News)

Crime News : तब्बल १९ वर्षांनंतर सापडला जिवंत

कल्याण, समालखा, पानिपतचा (हरियाणा) रहीवासी असलेला  बालेश कुमार.  १ मे २००४ रोजी बालेश कुमारने जोधपूरमध्ये त्यांच्या ट्रकमध्ये स्वतःला पेटवून घेतले होते. ज्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये बालेश नावाच्या एका व्यक्तीची ओळख पटली होती. त्याने  स्वतःला मृत घोषित करुन मोठा कट रचला होता. पण तो अजूनही जिवंत आहे. वास्तविक बालेशविरुद्ध दिल्लीच्या बवाना पोलीस ठाण्यात खुनाचा तर टिळक मार्ग पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोन्ही प्रकरणात तो फरार होता. याप्रकरणी गुन्हे शाखेने एफआयआर दाखल केला आहे.

नाव आणि पत्ता बदलून दिल्लीत राहत होता

आरोपी बालेश कुमार हे नाव आणि पत्ता बदलून दिल्लीत राहत होता. ही माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. तो नजफगढ भागात अमन सिंग नावाने राहत होता. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींना पकडण्याचा डाव आखला.

भावासह खून केला होता

आरोपी बालेश कुमार याने दारूच्या नशेत  त्याचा भाऊ सुंदर लाल याच्यासोबत मिळून राजेश उर्फ ​​खुशीराम नावाच्या व्यक्तीची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. पीएस बवाना परिसरात मृतदेह फेकून दिला होता. घटनेच्या दिवशी बालेश कुमार हा त्याचा भाऊ  सुंदर लाल आणि मृत राजेशसोबत दारू पीत होता. यावेळी मयताच्या पत्नीशी बाळेशचे अनैतिक संबंध आणि पैशाच्या व्यवहारावरून वाद झाला. या वादातून हा खून झाला होता.

हेही वाचा 

Back to top button