Pimpri News : डबक्यामुळे डासोत्पत्ती; रहिवाशांचे आरोग्य धोक्यात | पुढारी

Pimpri News : डबक्यामुळे डासोत्पत्ती; रहिवाशांचे आरोग्य धोक्यात

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी येथील पिंपरी-चिंचवड महापालिका भवनाशेजारी एक हाऊसिंग सोसायटी आहे. तेथे खोदलेल्या जागेत डबके तयार होऊन डेंगीचे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे सोसायटीतील अनेकांना डेंगी आजाराची लागण झाली आहे. या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.

महापालिका इमारतीच्या बाहेर पडण्याच्या प्रवेशद्वारा शेजारी एक हाऊसिंग सोसायटी आहे. सोसायटीच्या शेजारी रस्त्यास लागून खासगी जागा आहे. तेथे मोठ्या प्रमाणात खोदकाम केल्याने डबके तयार झाले आहे. त्या डबक्यात अनेक वर्षांपासून पाणी साचले आहे. त्यात डेंगीच्या डासांची उत्पत्ती होत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे.

या डासांमुळे सोसायटीतील अनेकांना डेंगीची लागण झाली आहे. या डबक्यामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्या बाबत महापालिकेकडे वारंवार तक्रार करूनही तातडीने उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असे सोसायटीचे रहिवाशी संतोष इंगळे यांनी सांगितले.

हेही वाचा

Nashik Crime : हप्ता दिला नाही म्हणून पेपर विक्रेत्याचा जाळला स्टॉल

Students Accident Insurance : राज्य सरकारचा मोठा निर्णय! आता विद्यार्थ्यांना मिळणार विमा

Navratri 2023 : शहराची संरक्षक देवी आकुर्डीची तुळजाभवानी  

Back to top button