Navratri 2023 : शहराची संरक्षक देवी आकुर्डीची तुळजाभवानी   | पुढारी

Navratri 2023 : शहराची संरक्षक देवी आकुर्डीची तुळजाभवानी  

पुढारी :  आकुडीतील तुळजा भवानी मंदिरातही नवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी होत असते. दरवर्षी येथे येणार्‍या भाविकांसाठी श्री तुळजाभवानी देवस्थान ट्रस्टतर्फे श्रीसुक्तपठण, महिलांकडून महाआरती, भावगीते व भक्तीगीतांचा कार्यक्रमांचे आयोजन असते.
आकुर्डीतील तुळजा भवानी मंदिर हे मंदिर प्राचीन देवस्थानापैकी एक मानले जाते. या मूळ मंदिराची बांधणी मोरया गोसावींनी केली असे म्हटले जाते. त्यानंतर हे मूळ मंदिर तसेच ठेवून भाविकांच्या सोयीसाठी त्याची बांधणी करण्यात आली आहे. आपल्या शहरात चारी बाजूंना चार देवी आहेत.

संबंधित बातम्या : 

शहराच्या चारी बाजूच्या तटबंदीवर देवीने संरक्षक म्हणून असावे अशी मोरया गोसावींची सुप्त इच्छा होती. याकरिता त्यांनी शहरात चारही दिशांना देवीची मंदिरे स्थापली आहेत. या देवी शहराचे संरक्षण करतात. अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे. त्यापैकी एक आकुर्डीची तुळजाभवानी माता. हे एक जागृत देवस्थान आहे अशी असे येथील भाविक सांगतात. चार देवी त्या शहराचे रक्षण करत आहेत. किवळे, वाकड, खराळवाडी आणि चौथी म्हणजे आकुर्डीची तुळजाभवानी.नवरात्रात देवीच्या दर्शनाला भाविक मोठ्या संख्येने मंदिरात येतात. देवीची शिळेतील  मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेते. या मंदिराचे जुने व दगडी असलेले पूर्वीचे बांधकाम आजही मजबूतरित्या उभे आहे.
दरवर्षी देवीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नवरात्रीत देवीच्या मंदिरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात.  नवरात्रीचे नऊ दिवस येथे कार्यक्रमाची धामधूम असते. देवीच्या आरतीसह, महाभोंडला, होमहवन, देवीचा महिमा सांगणारा गीतांचा कार्यक्रम असे कार्यक्रम दरवर्षी घेतले जातात.

Back to top button