Sinhagad Express : पिंपरी स्टेशनला प्रवाशांची धावपळ; गाडी पकडण्याच्या नादात अनेक प्रवाशी जखमी | पुढारी

Sinhagad Express : पिंपरी स्टेशनला प्रवाशांची धावपळ; गाडी पकडण्याच्या नादात अनेक प्रवाशी जखमी

पुढारी ऑनलाईन : पुणे मुंबईसाठी प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसह इतर प्रवाशांना नेहमीच गैरसोयीला सामोरं जावं लागत आहे. यामध्येच आज सकाळी सिंहगड एक्सप्रेस पिंपरी स्टेशनला नियमित वेगापेक्षा अधिक वेगाने धावत आली आणि जवळपास रोजच्या थांब्यापेक्षा काही मीटर अंतर पुढे जाऊन उभी राहिली. त्यामुळे चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. गाडीत बसण्याच्या धावपळीत अनेक प्रवासी प्लॅटफॉर्मवर पडले, यामध्ये दोन प्रवाशांना गंभीर मार लागला असून त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी की, पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेसने दररोज हजारो चाकरमानी प्रवास करत असतात. अनेक प्रवाशी सकाळी घाईमध्ये आपल्या कामावर वेळेवर पोहचण्यासाठी धावपळ करत असतात. मात्र रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशांना नेहमीच हा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच आज सकाळी गाडी रोजच्या थांब्या पेक्षा काही मीटर पुढे अंतरावर जाऊन थांबली. यामुळे प्रवाशांची धावपळ झाली. या घटनेत अनेक प्रवासी प्लॅटफॉर्मवर पडले, यामध्ये दोन प्रवाशांना गंभीर मार लागला आहे.

हेही वाचा

येरवड्यातील ‘त्या’ जागेवर पोलिस ठाणेच

Pune Accident News : टँकरच्या धडकेत आई-बापासमोर जुळ्या मुलींचा मृत्यू; पुण्यातील दुर्दैवी घटना

Navratri Fasting : कच्च्या केळींपासून बनवा चकली, उपवासासाठी नक्की ट्राय करा

Back to top button