

पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर) हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमअंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू असून 17 ते 19 आणि 26 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 1 या वेळेत द्रुतगतीमार्गाच्या मुंबई आणि पुणे वाहिनीवर वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ही माहिती दिली.
एमएसआरडीसीने दिलेल्या माहितीनुसार 17 ऑक्टोबरला पुणे वाहिनीवरील खंडाळा बोगदा व लोणावळा येथे 18 ऑक्टोबरला मुंबई वाहिनीवरील दस्तुरी पोलीस चौकी व खालापूर, 19 ऑक्टोबरला ढेकू गाव 26 ऑक्टोबरला खंडाळा बोगदा तर खोपोली एक्झीट वर गॅन्ट्री उभारण्याचे काम सुरू राहणार आहे.
हेही वाचा