कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दै.'पुढारी' आयोजित दसरा-दिवाळी शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये सुरू असलेली खरेदीची पर्वणी आता शेवटाकडे आली असून मंगळवार (दि. 17) हा या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे. दुचाकी, चारचाकी वाहनांच्या शहरातील अनेक शोरूमचे स्टॉल्स, त्याचबरोबर गृहपयोगी वस्तू, मसाले, पर्सनल केअरच्या वस्तू सजावटीच्या वस्तू यामुळे हा फेस्टिव्हल ग्राहकांची गर्दी खेचत आहे. राजारामपुरी कमला कॉलेजजवळील डॉ. व्ही. टी. पाटील सभागृहात सुरू असलेल्या या फेस्टिव्हलची मंगळवारी सांगता होणार आहे. रॉनिक स्मार्ट वॉटर हिटर आणि जय किसान शक्ती आटा चक्की या फेस्टिव्हलचे सहप्रायोजकआहेत.
होम अप्लायन्सेस, गारमेंट, होम डेकोर, ज्वेलरी, मसाले, बेकरी उत्पादने, आयुर्वेदिक प्रॉडक्ट या फेस्टिव्हलमध्ये उपलब्ध आहेत. फर्निचर, आटाचक्की, रोटी मेकर्स, किचन ट्रॉली, सौंदर्य प्रसाधने, कपडे, चहा व मसाल्यांचे पदार्थ, प्लास्टिकच्या विविध वस्तू, ज्वेलरी, साड्यांच्या असंख्य व्हरायटी, फॅन्सी ड्रेस, ड्रेस मटेरियल, सजावटीच्या वस्तू, पडदे, हेल्थ केअर, पर्सनल केअर, होम केअर असे शंभरांहून अधिक स्टॉल फेस्टिव्हलमध्ये गर्दी खेचत आहेत. खाद्य वस्तू, बेकरी आयटेम, लोणची, मसाले, पापड, मुखवास, ज्यूसर, तेलघाणा, आटा चक्क्या, चिमणी यांच्या खरेदीची संधी त्यांनी साधली.
सणांची खरेदी एकाच छताखाली देणार्या या फेस्टिव्हलमध्ये विविध उत्पादनांवर भरपूर डिस्काऊंट ऑफर देण्यात आल्या आहेत. होम अप्लायन्सेस, गारमेंट, होम डेकोर, ज्वेलरी, मसाले, बेकरी उत्पादने, आयुर्वेदिक प्रॉडक्ट या फेस्टिव्हलमध्ये उपलब्ध आहेत. गृहोपयोगी वस्तूंसाठी भव्य दालन, ऑटोमोबाईलचा स्वतंत्र विभाग, फर्निचर, आटाचक्की, रोटी मेकर्स, सौंदर्य प्रसाधने, कपडे, चहा व मसाल्यांचे पदार्थ, प्लास्टिकच्या विविध वस्तू, शूज, ज्वेलरी, साड्यांच्या असंख्य व्हरायटी, फॅन्सी ड्रेस, ड्रेस मटेरियल, सजावटीच्या वस्तू, हेल्थ केअर, पर्सनल केअर, होम केअर असे शंभरांहून अधिक स्टॉल फेस्टिव्हलमध्ये गर्दी खेचत आहेत.