NCB Raids : ‘एनसीबी’चे पुणे जिल्ह्यात छापे; जुन्नर, शिरूर परिसरातून 200 किलो ‘अल्प्रझोलम’ जप्त | पुढारी

NCB Raids : 'एनसीबी'चे पुणे जिल्ह्यात छापे; जुन्नर, शिरूर परिसरातून 200 किलो 'अल्प्रझोलम' जप्त

पुणे; पुढारी वृत्तसेवा : नाशिकमधील पाटील बंधूंच्या ड्रग्जच्या कारखान्यावर छापा टाकून कोट्यवधी रुपयांचे अमलीपदार्थ जप्त केल्यानंतर मुंबईतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (अमलीपदार्थ विरोधी पथक-एनसीबी) पथकाने पुणे जिल्ह्यातील जुन्नर, शिरूर तालुक्यात कारवाई केली. या कारवाईत एनसीबीच्या पथकाने 200 किलो अल्प्रझोलम जप्त केले.

मनोविकार, चिंंताविकारात वापरण्यात येणार्‍या औषधात अल्प्रझोलमचा वापर माफक प्रमाणावर केला जातो. त्यासाठी अन्न, औषध प्रशासन विभागाकडून मंजुरी दिली जाते. मनोविकार, चिंताविकारातील औषधी गोळ्यात वापरण्यात येणार्‍या अल्प्रझोलमचा वापर अमलीपदार्थ तयार करण्यासाठी केला जात असल्याचा संशय एनसीबीतील अधिकार्‍यांनी व्यक्त केला.

जुन्नर, शिरूर तालुक्यात अल्प्रझोलमची बेकायदा निर्मिती होत असल्याची माहिती एनसीबीच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर एनसीबीच्या पथकाने जुन्नर, शिरूर परिसरात छापा टाकून 200 किलो अल्प्रझोलम जप्त केले. एनसीबीच्या पथकाने याबाबतची माहिती स्थानिक पोलिसांना दिली असून, पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकार्‍यांनी दिली.

हेही वाचा

बंगळुरूत घरात सापडले 42 कोटींचे घबाड; 500 च्या नोटांचे 23 बॉक्‍स, IT अधिकारीही चक्रावले

महती नवदुर्गांची : श्री प्रत्यंगिरादेवी (फिरंगाई)

Pune Navratri 2023 : पुण्यातील देवीच्या मंदिरांमध्ये विधिवत होणार घटस्थापना

Back to top button