ससून प्रकरणात बोलघेवडे भाजप नेते गप्प का ? माजी आमदार मोहन जोशी यांचा सवाल | पुढारी

ससून प्रकरणात बोलघेवडे भाजप नेते गप्प का ? माजी आमदार मोहन जोशी यांचा सवाल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ससून सर्वोपचार रुग्णालयातील अमलीपदार्थांच्या व्यवहाराचे रॅकेट उघड होऊन 11 दिवस लोटले, तरी राज्य सरकार ढिम्मच आहे, बोलघेवडे भाजप नेते गप्प बसले आहेत, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केला आहे. या प्रकरणात राज्य सरकार कोणत्या मंत्र्याला वाचवतंय, असा सवालही जोशी यांनी केला आहे.

सामान्य लोकांसाठी आधार असलेले ससून सर्वोपचार रुग्णालय अमलीपदार्थांच्या तस्करीचा अड्डा बनले, ही बाब पुणेकरांसाठी धक्कादायक आहे. हे प्रकरण उघडकीस येताच मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाई करायला हवी होती. एरवी कोणत्याही प्रश्नावर वायफळ बडबड करणारे भाजपचे बोलघेवडे नेते आता मूग गिळून गप्प बसले आहेत. त्यांचे मौनही संतापजनक आहे, असे जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

हेही वाचा

Pune Navratri 2023 : मंडप उभारणी, विद्युत रोषणाई अन् फुलांची सजावट

Pune Garbage News : मग आम्ही कचर्‍याचे करायचे काय? नागरिकांचा प्रशासनाला सवाल

यंदा कॅम्पसमधून IT फ्रेशर्स भरती नाही, Infosys ने दिले कारण

Back to top button