Bhimrao Tapkir : भीमराव तापकीर यांच्या बनावट खात्यावरून पैशांची मागणी

Bhimrao Tapkir : भीमराव तापकीर यांच्या बनावट खात्यावरून पैशांची मागणी
धनकवडी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : खडकवासल्याचे आमदार  भीमराव तापकीर यांचे फेसबुक अकाउंट क्लोन करून त्याद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून अनेकांकडून पैशाची मागणी केली जात आहे. सामाजिक कार्यकर्ते राकेश सावंत यांना चार-पाच दिवसांपूर्वी आमदार तापकीर यांच्याकडून फेसबुकवरून फ्रेंड रिक्वेस्ट आली. ती त्यांनी मंजूर केली.
त्यांना दोन दिवसांनी सीआरपीएफ जवानाची बदली झाली आहे व त्याच्याकडे घरगुती वापराचे जुने फर्निचर व फ्रिज-एसी सारखे इलेक्ट्रिक साहित्य अगदी किरकोळ किमतीत उपलब्ध आहे,  अशी माहिती मेसेंजरवरून देण्यात आली. याबाबत सावंत यांना शंका आली. याबाबत तापकीर यांच्याशी संपर्क साधला व त्याविषयी माहिती दिली. याबाबत चौकशी करण्याचे पत्र पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहे.
मेटा येथे ई-मेलद्वारे संदेश देऊन हे अकाउंट बंद करण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. यावरून भीमराव तापकीर यांच्या नावाचे फेक अकाउंट बंद करण्यात आले आहे.
– सुरेंद्र माळाळे, 
वरिष्ठ पोलिस निरीक्षक
हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news