ED Raid : ‘ईडी’कडून पुण्यात छापे; १०० कोटींचा गंडा घालणाऱ्यांना दणका | पुढारी

ED Raid : ‘ईडी’कडून पुण्यात छापे; १०० कोटींचा गंडा घालणाऱ्यांना दणका

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यभरातील गुंतवणूकदारांची शंभर कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पुण्यातील कात्रज भागात कारवाई केली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. विनोद तुकाराम खुंडे, संतोष तुुकाराम खुंटे, मंगेश खुंटे, किरण पितांबर अनारसे, अजिंक्य बडवे अशी गु्न्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहे. याबाबत ईडीच्या अधिकार्‍यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आयपीएस ग्रुप ऑफ? कंपनी आणि ग्लोबल फिलेट कंपनी स्थापन केली होती. या कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष आरोपींनी गुंतवणूकदारांना दाखविले होते. राज्यभरातील गुंतवणूकदारांनी या कंपनीत पैसे गुंतविले होते.

आरोपींनी गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा केले. ही रक्कम कंपनीच्या खात्यात जमा केली नाही. आरोपींनी बनावट नावाने बँकेत खाते काढले होते. या खात्यात गुंतवणुकदारांकडून गोळा केलेली रक्कम जमा करण्यात आली होती. काहीजणांना मध्यस्थ राहण्यास आरोपींनी सांगितले होते. गुंतवणूकदारांना प्रोत्साहित केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष आरोपींनी दाखविले होते.

मुख्य सूत्रधार विनोद खुंटे याने गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळले होते. परदेशी मुद्रा विनिमय व्यवहार पाहणारी काना कॅपिटल नावाची कंपनी त्याने स्थापन केली. गुंतवणूकदारांना या कंपनीत गुंतणूक करण्यास सांगितले. त्यानंतर कंपनी बंद करून आरोपी पसार झाले. ईडीच्या पथकाने मंगळवारी कात्रज भागातील आंबेगाव बुद्रुक परिसरातील कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकला.

हेही वाचा

ऑलिम्पिकसाठी भरारी

बायकोच उठली जिवावर; पतीच्या अंगावर ओतलं उकळतं पाणी

बिहारमध्ये पाकिस्तान नावाचे खेडे, बाहेरील लोक येण्यासही कचरतात, विवाह होण्यासही अडचणी

Back to top button