पुणे शहराचा पारा 34.1 अंशावर | पुढारी

पुणे शहराचा पारा 34.1 अंशावर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरातून मान्सून माघारी जात नाही तोच कमाल तापमानात तब्बल 8 अंशांनी वाढ झाली आहे. शहराचा पारा 5 ऑक्टोबरपर्यंत 25 ते 26 अंशांवर होता. गेल्या आठवडाभरात तापमानातील बदल वेगाने झाला आहे. दरवर्षी शहरातून मान्सून ऑक्टोबरच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या आठवड्यात माघारी जातो. त्यामुळे कमाल तापमानात वाढ होण्यास ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा उजाडतो. मागच्या वर्षी शहरात संपूर्ण ऑक्टोबर महिना पाऊस होता, त्यामुळे ऑक्टोबर हीट जाणवलीच नाही.

नोव्हेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात उन्हाचा तडाखा जाणवण्यास सुरुवात झाली होती. मात्र, यंदा दोन आठवडे आधीच ऑक्टोबर हीट जाणवू लागली आहे. 5 ऑक्टोबरपर्यंत शहराचे कमाल तापमान 25 ते 26 अंशांवर, तर किमान तापमान 18 ते 21 अंशांवर होते. मात्र, तीनच दिवसांत वातावरण बदलले. कमाल तापमानात एकदम 8 अंशांनी वाढ झाली. पारा 34 अंशांवर गेला आहे. सोमवारी (दि. 9) शहराचे तापमान 34.1 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले.

पावसाचे प्रमाणही घटले

यंदा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात शहरात केवळ 16 मिमी पावसाची नोंद झाली. शहरातील पावसाची ऑक्टोबरची सरासरी 140 ते 160 मिमी इतकी आहे. पहिल्या आठवड्यात 60 ते 100 मिमी पाऊस होतो. आता मान्सून माघारी फिरल्याने वातावरण कोरडे असून, पावसाची शक्यता नाही. त्यामुळे ऑक्टोबरच्या सरासरीत तब्बल 130 ते 150 मिमीची तूट राहणार आहे.

हेही वाचा

Nagar News : वडगावपानसह 21 गावांत दहा दिवस निर्जळी !

नवरात्रौत्सव २०२३ : मातेच्या नात्याने जोडलेली पार्वती

Israel Hamas War: हमासच्या हल्ल्यात भारतीय परिचारिका जखमी

Back to top button