पुढारी ऑनलाईन डेस्क : हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात एक भारतीय महिला जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. केरळमधील शीजा आनंद असे तिचे नाव आहे. ४१ वर्षीय शिजा इस्रायलमध्ये नर्स म्हणून काम करते. ऑक्टोबर २०१५ मध्ये हमासने इस्रायलवर हल्ला केला. तेव्हा शीजा तिच्या कुटुंबीयांना फोन करून तिच्या प्रकृतीची माहिती देत होती. (Israel Hamas war)
हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर ७ ऑक्टोबररोजी शिजाने तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आणि आपण सुरक्षित असल्याचे सांगितले. त्याच दिवशी दुपारी तिने पतीला पुन्हा फोन केला, पण संपूर्ण संभाषण होऊ शकले नाही. पतीसोबत व्हिडिओ कॉल सुरू असताना अचानक कॉल डिस्कनेक्ट झाला. संपर्क तुटण्यापूर्वी एक 'मोठा आवाज' ऐकू आला. मोठ्या आवाजाने कॉल डिस्कनेक्ट झाला. संध्याकाळी शीजा जखमी झाल्याचे समोर आले. तिच्या हाताला व पायावर जखमा झाल्याची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली. शिजा यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार शिजाच्या बहिणीने एका टीव्ही चॅनेलला सांगितले की, ८ ऑक्टोबर रोजी दुपारी कुटुंबीयांनी शीजाला व्हिडिओ कॉलवर पाहिले. यादरम्यान शिजा तिच्या आईला म्हणाली, 'अम्मा, मी ठीक आहे.'
शिजाच्या मणक्याची शस्त्रक्रिया करावी लागणार
शिजा गेल्या ७ वर्षांपासून इस्रायलमध्ये काम करत आहे. शीजा आनंदचा नवरा पुण्यात काम करतो. त्याला दोन मुले आहेत, जी आपल्या वडिलांसोबत भारतात आहेत. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत १२०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलमध्ये किमान ८०० लोक ठार आणि २,१०० हून अधिक जखमी झाले आहेत. इस्रायलच्या प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात गाझा पट्टीमध्ये सुमारे ५०० लोकांचा मृत्यू आणि २,००० हून अधिक लोक जखमी झाल्याची बातमी समोर आली आहे.
हेही वाचा