Baramati : अजित पवारांच्या पालकमंत्रिपदी निवडीनंतर बारामतीत जल्लोष | पुढारी

Baramati : अजित पवारांच्या पालकमंत्रिपदी निवडीनंतर बारामतीत जल्लोष

बारामती : पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्याच्या पालकमंत्रिपदी निवड झाल्यानंतर बारामती येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयाच्या वतीने शारदा प्रांगण येथील शहर पार्टी कार्यालयासमोर फटाके वाजवत पवार यांच्या निवडीचे स्वागत करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांच्याकडून अजित पवारांचे अभिनंदन करण्यात आले. अजित पवार यांच्या पालकमंत्रिपदाचा लाभ पुणे जिल्ह्यासह बारामती तालुक्याला आणि शहराला होईल, असे मत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील यांनी व्यक्त केले.

संबंधित बातम्या : 

या वेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून अजित पवारांच्या कर्तृत्वाचे भरभरून कौतुक करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जय पाटील, विशाल जाधव, साधू बल्लाळ, प्रताप पागळे, महिला अध्यक्षा अनिता गायकवाड, श्रीकांत जाधव, प्रताप पागळे, आदित्य हिंगणे, विशाल जाधव, सूरज शिंदे, साधू बल्लाळ, संतोष जगताप, सुधाकर माने आदींसह इतर कार्यकर्ते व महिला पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

Back to top button