Sassoon hospital News : ससूनमधून दोन आरोपींना डिस्चार्ज | पुढारी

Sassoon hospital News : ससूनमधून दोन आरोपींना डिस्चार्ज

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ससून रुग्णालयात कैद्यांचा मुक्काम लांबत असल्याचे वृत्त दै. ‘पुढारी’मध्ये प्रसिध्द झाले होते. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने बुधवारी दोन कैद्यांना तातडीने डिस्चार्ज दिला. यामध्ये कैद्यांच्या वॉर्ड क्रमांक 16 मधील एक आणि बाहेरच्या वॉर्डमधील एका गर्भवती महिला कैद्याला डिस्चार्ज देण्यात आला.

ससून रुग्णालयाच्या कैद्यांच्या वॉर्डमध्ये नऊ जण दाखल आहेत. त्यांच्यापैकी काही जण दीड महिन्यापासून, तर काही जण नऊ महिन्यांपासून तळ ठोकून आहेत. कारागृहात बंदी होऊन राहण्यापेक्षा आजाराच्या नावाखाली रुग्णालयातील वॉर्डमध्ये राहणे कैद्यांकडून पसंत केले जात आहे.

ड्रग्ज प्रकरणातील आरोपी ललित पाटील फरार झाल्यानंतर ससून आणि पोलिस प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. कैद्यांना डिस्चार्ज देणे सहजशक्य नसल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, प्रशासनावर निर्माण झालेल्या दबावामुळे आणि वृत्त प्रसिध्द झाल्यामुळे बुधवारी सायंकाळपर्यंत दोन कैद्यांना कारागृहात पाठविण्यात आल्याचे समजते.

बुधवारी ‘पुढारी’च्या प्रतिनिधीने वॉर्ड क्रमांक 16 ची बाहेरून पाहणी केली. त्या वेळी तेथील पोलिस कर्मचाऱ्यांचा पहारा वाढविल्याचे लक्षात आले. एक-दोन दिवसांत येथील काही रुग्णांना डिस्चार्ज दिला जाऊ शकतो, असे एका कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

हेही वाचा

Nashik News : पावसाच्या विश्रांतीनंतर ग्रामीण भागाला पुन्हा टंचाईच्या झळा

Ajit Pawar : सुप्त संघर्षात अजित पवारांची सरशी

कोल्हापुरात २० मिनिटांत ११ मि.मी. पावसाचा तडाखा

Back to top button