राज्यात 27 हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा धडाका

file photo
file photo
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुका शासनाच्या आदेशान्वये 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या, अशा सहकारी संस्थांच्या निवडणुका येत्या सोमवारपासून (दि.9 ) सुरू करण्याचे आदेश सोमवारी (दि.3) राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी जारी केले आहेत. त्यानुसार आता 27 हजार 64 सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा धडाका पुन्हा सुरू होत आहे.

सहकारी संस्थांच्या वर्गवारीनुसार 'अ' वर्गातील 49, 'ब' वर्ग 1 हजार 815, 'क' वर्ग 12 हजार 300 आणि 'ड' वर्गातील 12 हजार 900 संस्थांचा समावेश आहे. प्राधिकरणाचे सचिव वसंत पाटील यांनी जारी केलेल्या आदेशात पुढे म्हटले आहे, की जिल्हा सहकारी निवडणूक अधिकार्‍यांनी ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांकरिता प्रारूप अथवा अंतिम मतदार याद्या या दिनांक 7 जून 2023 पर्यंत किंवा त्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत, अशा सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत, त्या टप्प्यापासून सुरू करावयाच्या आहेत.

तसेच, ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीकरिता 8 जून 2023 ते 21 ऑगस्ट 2023 या कालावधीत प्रारूप अथवा अंतिम मतदार यादया प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत, अशा सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकांकरिता दिनांक 1 ऑक्टोबर 2023 या अर्हता दिनांकावर (कट ऑफ डेट) नव्याने प्रारूप मतदार यादया तयार करावयाची आहे.

ज्या प्रलंबित सहकारी संस्थांच्या निवडणुकांकरिता प्रारूप मतदार यादया प्रसिद्ध करण्यात आलेल्या नाहीत, अशा प्रलंबित सहकारी संस्थांच्या निवडणुकांकरिता प्रारूप मतदार यादया तयार करण्यासाठी आवश्यकतेनुसार अर्हता दिनांकाबाबतचे (कट ऑफ डेट) प्रस्ताव कारणमीमांसा नमूद करून प्राधिकरणास सादर करण्याबाबतही जिल्हा सहकारी निवडणूक अधिकार्‍यांना कळविण्यात आले आहे.

संघीय संस्थांच्या निवडणुूकांकरिता सभासद संस्थांनी प्रतिनिधी नियुक्तीचे ठराव जिल्हा/तालुका/प्रभाग सहकारी निवडणूक अधिकार्‍यांना सादर केलेले असल्यास पुन्हा ठराव मागविण्याची आवश्यकता नाही. तथापि, महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम 2014 चे नियम 10 (4) मध्ये नमूद केलेल्या परिस्थितीत बदल करण्याची मुभा असलेले बदल जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांनी स्वीकारावेत, असेही त्यामध्ये म्हटले आहे. तसेच, नवीन अर्हता दिनांकामुळे (कट ऑफ डेट) सभासद संस्था, नव्याने पात्र होत असल्यास अशा संस्थांकडून प्रतिनिधी नियुक्ती ठराव मागविण्याची प्रक्रिया जिल्हा सहकारी निवडणूक अधिकार्‍यांनी करावयाची असल्याचे प्राधिकरणाने कळविले आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news