अमेरिकेत आरोपीला विषारी इंजेक्शन देऊन मारण्याची शिक्षा | पुढारी

अमेरिकेत आरोपीला विषारी इंजेक्शन देऊन मारण्याची शिक्षा

फ्लोरिडा, वृत्तसंस्था : अमेरिकेच्या फ्लोरिडातील एका आरोपीला आपल्या मैत्रिणीची हत्या केल्याच्या सुमारे 25 वर्षांनंतर भयंकर शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपी मायकल जॅक याला मैत्रीण आणि एका बारमधील महिला कर्मचारी रेवॉन स्मिथ हिची हत्या केल्याप्रकरणी विषारी इंजेक्शन देऊन मारण्यात आले. मायकलही त्या बारमध्ये काम करत होता.

जून 1996 मध्ये मायकलने रेवॉनला पहिल्यांदा मैत्रीण बनवले. त्यानंतर तिला मारहाण केली आणि एक दिवस त्याने तिची चाकूने वार करून हत्या केली. आरोपी मायकल याने लॉरा नावाच्या एका व्यक्तीचीही हत्या केली होती. या प्रकरणात मायकल दोषी ठरला होता. यामध्ये त्याला वेगळी आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

मायकल यानेही रेवॉनची हत्या केल्याची कबुली दिली आहे. रेवॉनने माझ्या आईच्या मृत्यूवरून खिल्ली उडवल्याने मला राग आला. त्यामुळे तिला मी मारहाण केली. रेवॉनच्या बहिणीनेच माझ्या आईची हत्या केली होती. त्याचा बदला घेण्यासाठी मी रेवॉनची हत्या केली असल्याचे मायकल याने सांगितले.

Back to top button