Nagar News : आरोग्य खात्यालाच उपचाराची गरज ! रुग्णांची हेळसांड

Nagar News : आरोग्य खात्यालाच उपचाराची गरज ! रुग्णांची हेळसांड
Published on
Updated on

भेंडा : पुढारी वृत्तसेवा :  नेवासा तालुक्यातील आरोग्य केंद्रामध्ये तालुका आरोग्य अधिकार्‍यांसह विविध एकूण 73 जागा रिक्त आहेत. रिक्त जागेवरील कर्मचार्‍यांचे काम इतर कर्मचार्‍यांना करावे लागत आहे. अतिरक्त कामाच्या होणार्‍या ओढाताणीमुळे कर्मचार्‍यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, उपचारासाठी येणार्‍या रुग्णांनाही त्यामुळे विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे तालुक्यात सध्या आरोग्य खात्यालाच उपचारांची गरज आहे. सद्यस्थितीत पावसाळ्याचे दिवस असल्याने विविध साथरोग व इतर आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. रुग्णसंख्येच्या मानाने सध्या असणारा कर्मचारी वर्ग अपुरा आहे.

संबंधित बातम्या : 

तालुक्यातील 9 प्राथमिक आरोग्य केंद्र व 42 उपकेंद्र मिळून एकूण 271 विविध पदांपैकी फक्त 198 पदांवरील कर्मचारीच कार्यरत आहेत. तब्बल 73 पदे रिक्तच आहेत. त्यातही काहींच्या नैमित्तिक रजा, आजारपण व प्रासंगिक वा अचानक उद्भवणार्‍या कारणांमुळे त्यातीलही काही रजेवर असतात. त्यामुळे एकूणच कामाचा ताण उर्वरित कर्मचार्‍यांवर येतो. त्यातून अरेरावी, हमरीतुमरी व प्रसंगी भांडणाचेही प्रकार रुग्ण व नातेवाईकांशी घडतात. तालुक्यात गाव पातळीवर अत्यंत महत्त्वाचे असणारे आरोग्य सेवक पुरुष, परिचर व महिला आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी ही पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत.

तालुक्यात 9 प्राथमिक आरोग्य केंद्र असून, त्यापैकी टोका, उस्थळ दुमाला, सोनई, सलाबतपूर, नेवासा बुद्रुक व शिरसगाव येथे वैद्यकीय अधिकारी नाही. तसेच, कुकाणा, चांदा, सोनई, उस्थळ दुमाला व नेवासा बुद्रुक येथे महिला आरोग्य सहाय्यक नाहीत. कुकाणा, सोनई, उस्थळ दुमाला, चांदा, टोका, नेवासा खुर्द आणि सलबतपूर येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ नाहीत. सोनई, शिरसगाव, कुकाणा, टोका, सलाबतपूर, चांदा येथे प्रत्येकी 1 आणि नेवासा बुद्रुक, नेवासा खुर्द व उस्थळ दुमाला येथे प्रत्येकी 2 परिचर नाहीत. या रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात, अशी मागणी रुग्ण व नातेवाईकांमधून होत आहे.

तालुक्यातील मंजूर व रिक्त पदे
तालुका आरोग्य अधिकारी 1 पैकी 1 (सध्या प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी नियुक्त), वैद्यकीय अधिकारी 20 पैकी 7, समुदाय आरोग्य अधिकारी 37 पैकी 1, आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य सहाय्यक 12 पैकी 1, आरोग्य सेवक पुरुष 21 पैकी 9, आरोग्य सहाय्यक स्री 9 पैकी 5, आरोग्य सेवक महिला 52 पैकी 22, औषध निर्माण अधिकारी 9 पैकी 3, कनिष्ठ सहाय्यक 10 पैकी 2, परिचर 28 पैकी 12, सफाई कामगार 9 पैकी 2, प्रयोगशाळा तंत्रज्ञान 9 पैकी 7.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news