Nanded Hospital death : सरकारमधील तीन पक्ष ठणठणीत, बाकी महाराष्ट्र आजारी: राज ठाकरे | पुढारी

Nanded Hospital death : सरकारमधील तीन पक्ष ठणठणीत, बाकी महाराष्ट्र आजारी: राज ठाकरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : नांदेडच्या शासकीय रूग्णालयात २४ तासांत १२ नवजात बालकांसह २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यावरून राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या घटनेबाबत एक्सवर पोस्ट टाकून राज्यातील तीन इंजिनच्या सरकारवर तोफ डागली आहे. (Nanded Hospital death)

राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, नांदेडमधील सरकारी रुग्णलयात गेल्या २४ तासांत २४ मृत्यू झाले. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. मध्यंतरी ठाण्यात देखील अशीच घटना घडली होती. राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये औषधाचा तुटवडा आहे. मुंबईत तर टीबीच्या औषधांचा तुटवडा असल्यामुळे ‘औषध पुरवून वापरा’ असा सल्ला दिला जात आहे, असे कळत आहे.

आणि या घटना फक्त नांदेड, ठाणे आणि मुंबईपुरत्या नाहीत, तर सर्वत्र आहेत. तीन तीन इंजिनं लागून पण राज्याचे आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय? सरकारच्या तिन्ही पक्षांनी स्वतःचा पुरेसा विमा उतरवल्यामुळे त्यांना कसलीच काळजी नाहीये, पण महाराष्ट्राचे काय ?, दुर्दैव असे की सरकारमधील तीन पक्ष ठणठणीत सोडून बाकी महाराष्ट्र आजारी आहे, अशी परिस्थिती आहे. सरकारने स्वतःच आयुर्मान वाढवण्यासाठीची धडपड कमी करून महाराष्ट्राचे आरोग्य कसे सुधारेल, याकडे अधिक लक्ष द्यावे, असा सल्ला राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये दिला आहे.

हेही वाचा 

Back to top button