

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : गणपती विसर्जित करीत असलेला तरुण पवना नदीत बुडून बेपत्ता झाला. गुरुवारी (दि. 28) सायंकाळी गहुंजे येथे सायंकाळी ही घटना घडली. प्रभू दयाल विश्वकर्मा (24, रा. रुपीनगर, चिखली) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचा नाव आहे. सरपंच कुलदीप बोडके यांनी गहुंजे येथील स्मशानभूमीच्या बाजूला प्रभू विश्वकर्मा पाण्यात बुडाल्याची माहिती दिली.
त्यानुसार, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रभू यांचे मित्र अवधेश कुमार राव (रा. साईनगर, गहुंजे ) यांनी पोलिसांना नेमकी जागा दाखवली. दरम्यान, काही रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, रात्रीची वेळ असल्याने शोधमोहीम थांबवण्यात आली.
शुक्रवारी (दि. 29) दुसर्या दिवशी पुन्हा शोध घेण्यात आला. मात्र, प्रभू यांचा शोध लागला नाही. तपास शिरगाव पोलिस करीत आहेत.
हेही वाचा