मुंबई-पुणे महामार्गावर एसटी-ट्रेलरचा भीषण अपघात; वाहकाचा जागीच मृत्‍यू

एसटी-ट्रेलरचा अपघात
एसटी-ट्रेलरचा अपघात

पणवेल विक्रम बाबर : पुढारी वृत्‍तसेवा मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर रसासनी जवळ (शुक्रवार) रात्री एसटी आणि ट्रेलरचा भीषण अपघात झाला. या अपघातात एसटी वाहक ( कंडक्टर ) हा जागीच ठार झाला. तर ट्रेलर मधील चालक हा गंभीर जखमी झाला असून, कळंबोली मधील एका रुग्णालयात त्‍यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मुंबई-पुणे महामार्गावर (शुक्रवार) ठाणा डेपोची  उमरगा ते ठाणे ही एसटी महामंडळाची बस, पुण्याहून मुबईकडे चालली होती. रसायनी जवळ आल्यानंतर एसटी चालकाने प्रवाशी उतरवण्यासाठी महामार्गावरील रिसवाडी उड्डाणपुलाजवळ शोल्डर लाईनला एसटी उभी केली. यावेळी बसमधील प्रवाशांना कंडक्टर शिवराज माळी (वय 35) यांनी खाली उतरविले आणि माळी हे  एसटीच्या पाठीमागे जाऊन उभे राहिले. याच वेळी काही मिनिटांतच पाठीमागून पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या Nl 01 AF 7922 या नंबरच्या ट्रेलरलने रिसवाडी उड्डाणपुलाजवळ शोल्डर लेनला उभ्या असलेल्या एसटीला मागून जोरात ठोकर  मारली.

ही ठोकर एवढी भयानक होती की, एसटीच्या मागे उभा असलेले कंडक्टर शिवराज माळी हे या दोन्ही वाहनांच्या मध्ये अडकले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.  ट्रेलर चालकाला  महामार्गावर उभी असलेली एसटी दिसून न आल्याने ट्रेलर चालकाचा ट्रेलर वरचा ताबा सुटला आणि हा अपघात घडला असावा असे सांगितले जात आहे.  या अपघातामध्ये एसटीतील प्रवासी सुखरूप असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या अपघातामध्ये ट्रेलर चालकाच्या पायाला, डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news