Pune news : मांदळेवाडी येथे चालू वर्षी पहिल्यादांच ओढ्यांना मोठा पूर | पुढारी

Pune news : मांदळेवाडी येथे चालू वर्षी पहिल्यादांच ओढ्यांना मोठा पूर

लोणी धामणी : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात लोणी, धामणी, वडगावपीर, मांदळेवाडी परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मांदळेवाडी येथे चालू वर्षी पहिल्यादांच ओढ्यांना मोठा पूर आल्याचे सरपंच कोंडीभाऊ आदक व माजी उपसरपंच माधूरी आदक यांनी सांगितले.

धामणी येथे ढगफूटीसदृश पाऊस झाल्याने येथे चालू वर्षी पहिल्यांदाल ओढे, नाले दुथडी वाहू लागल्याने या परिसरातील नागरीकांनी समाधान व्यक्त केले. या आधी सन २०१५ येथे ढगफूटी सदृश पाऊस झाला होता. आता तबल नऊ वर्षांनी ढगफूटीसदृश पाऊस झाल्याने धामणी येथील ओढे, नाले दुथडी भरून वाहात असल्याचे ग्रामपंचायत सदस्य प्रतिक जाधव यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button