Cloud seeding : बेळगावात शुक्रवारपासून क्लाऊड सीडींग | पुढारी

Cloud seeding : बेळगावात शुक्रवारपासून क्लाऊड सीडींग

बेळगाव; जितेंद्र शिंदे : पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या मालकीच्या बेळगाव शुगर्सच्या वतीने पावसासाठी बेळगाव जिल्ह्यात २९ आणि ३० सप्टेंबर रोजी क्लाउड सीडिंग (ढगांवर फवारणी) काम करण्यास डीजीसीएने परवानगी दिली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली आहे.

नागरी विमान वाहतूक महासंचालक कार्यालयाने (DGCA) बेळगाव शुगर्सच्या वतीने 29 आणि 30 सप्टेंबर रोजी बेळगाव जिल्ह्यात क्लाउड सीडिंगचे काम करण्यास परवानगी दिली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे बेळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी बेळगाव शुगर्सने क्लाऊड सीडिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला नागरी विमान वाहतूक महासंचालक कार्यालयाने (DGCA) क्लाउड सीडिंगला हिरवा सिग्नल दिला आहे. 29 व 30 सप्टेंबर रोजी दुपारी 1 ते 4 या वेळेत क्लाउड सीडिंग करण्यात येणार आहे.

कॅप्टन वीरेंद्र सिंग आणि कॅप्टन आदर्श पांडे यांच्या नेतृत्वाखालील VT-KCM फ्लाइट क्लाउड सीडिंग होणार आहे, असे जिल्हाधिकारी पाटील यांनी कळविले आहे.

Back to top button