Goa Chief Minister : गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली अवयवदानाची शपथ; ब्रेन डेथ झाल्यानंतर तीन अवयव दान करणार | पुढारी

Goa Chief Minister : गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली अवयवदानाची शपथ; ब्रेन डेथ झाल्यानंतर तीन अवयव दान करणार

पणजी; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय आरोग्य मंत्रालय व भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय विभागाने सुरू केलेल्या अवयव दान मोहिमेची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज (दि. २८) सुरुवात केली. त्यांनी आपल्या ब्रेन डेथनंतर लिव्हर, किडनी व कोर्नीया दान करण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरला व प्रमाणपत्र देखील मिळवले.

भाजपचे गोवा प्रदेश सरचिटणीस दामोदर उर्फ दामू नाईक यांनीही अवयव दान करण्याची शपथ घेऊन अर्ज भरला आणि प्रमाणपत्र प्राप्त केले. यावेळी भाजपा गोवा वैद्यकीय विभागाचे संयोजक डॉ. शेखर साळकर आणि सहसंयोजक डॉ. स्नेहा भागवत उपस्थित होत्या.

गोव्यामध्ये आजच्या घडीला ४६ व्यक्तींना किडनीची गरज आहे. त्यामुळे लोकानी किडनी दान करुन त्यांना जिवनदान द्यावे. ब्रेन डेथ नंतर अवयव दान करण्यासाठी लोकांनी अर्ज भरावेत आणि आपल्या मृत्यूनंतर किमान पाच व्यक्तींना जीवनदान देण्याच्या या मोहिमांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले .

एक व्यक्ती ब्रेन डेथ झाल्यानंतर पाच ते सहाजनांना जीवनदान देऊ शकतो. हृदय , किडनी , लिव्हर , कोर्नीया व लम्स अशा माध्यमातून हे जीवनदान देणे शक्य आहे. अशी माहिती डॉ. साळकर यांनी दिला. अपघात होउन तिथेच म्रुत्यू आल्यास दोन तासात डोळे दान करता येतात. असेही ते म्हणाले.

Back to top button