पंकजा मुंडे भारतीय जनता पार्टीची लेक नाही का? खासदार सुप्रिया सुळे यांचा भाजपला सवाल

पंकजा मुंडे भारतीय जनता पार्टीची लेक नाही का? खासदार सुप्रिया सुळे यांचा भाजपला सवाल
Published on
Updated on

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा :  विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. त्यांनी सांगितल्यावर तरी काहीतरी निर्णय होईल, अशी आमची अपेक्षा होती. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या पक्षाची जबाबदारी त्यांना उद्धव ठाकरे यांच्यावर दिली होती. ही पार्श्वभूमी असताना त्यांच्याकडून त्यांचा पक्ष, त्यांचे चिन्ह काढून घेण्याचे पाप शिंदे गटाने केले आहे. हे दुर्दैव असून, ते महाराष्ट्राच्या राजकारणाला न शोभणारा आहे, असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केला. सोमवारी (दि. 25) खासदार सुळे इंदापूर शहराच्या दौर्‍यावर होत्या. जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांच्या निवासस्थानी युवा कार्यकर्ता संवाद बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

संबंधित बातम्या :

खा. सुळे म्हणाल्या, गोपीनाथ मुंडे हयात नाहीत, म्हणून त्यांच्या लेकीशी तुम्ही कसेही वागाल? हा अन्याय आहे. कोणतही राजकारण न करता या राज्यातील आणि देशातील कुठल्याही लेकीवर अन्याय होत असेल तर मी तिच्या बाजूने खंबीरपणे उभी राहील.
भाजपाच्या दिल्लीतील एका खासदाराचे घर जीएसटी आणि टॅक्स प्रॉब्लॅममध्ये आले होते. मात्र, भारतीय जनता पक्ष म्हणा किंवा अदृश्य हाताने त्यांच्या घराचा लिलाव कसा थांबवला, असा सवाल उपस्थित करीत एकीकडे 'बेटी पढाव आणि बेटी बचाव' म्हणणारी ही लोकं मग पंकजा मुंडे भाजपाची लेक नाही का?असा प्रतिसवालदेखील सुळे यांनी भाजपला केला आहे.

या वेळी सोनाई उद्योग समूहाचे अध्यक्ष दशरथ माने, माजी सभापती प्रवीण माने, अमोल भिसे, किसन जावळे, सागर मिसाळ, विठ्ठल ननवरे, छाया पडसळकर, भारत मोरे यांच्यासह युवकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. दरम्यान, खासदार सुळे यांनी भरपावसात भिजत इंदापूर शहराचे ग्रामदैवत इंद्रेश्वर मंदिरात तसेच अनेक सार्वजनिक गणेश उत्सवात भेट देऊन गणरायाच्या आरती केल्या.

शिंदे गटाचे तालुकाप्रमुख खा. सुळेंच्या संपूर्ण दौर्‍यात…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करून इंदापूर तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी असलेले विद्यमान तालुकाप्रमुख महारुद्र पाटील हे खासदार सुप्रिया सुळे यांच्या आजच्या दिवसभराच्या दौर्‍यात उघडपणे उपस्थित होते. पाटील हे लवकरच घरवापसी करणार, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.फ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news