Baramati : बारामतीत भाजपकडून पडळकरांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक

Baramati : बारामतीत भाजपकडून पडळकरांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
Published on
Updated on

बारामती : पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी अवमानजनक वक्तव्य केल्यानंतर आमदार गोपिचंद पडळकर यांच्या विरोधात बारामतीत राष्ट्रवादीने त्यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन केले होते. मंगळवारी (दि. २६) त्याच ठिकाणी भाजपने आमदार पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातला. यानिमित्ताने बारामतीत राष्ट्रवादी व भाजप आमनेसामने उभे ठाकले आहे.
आमदार पडळकर यांच्या निषेधार्थ बारामतीत भिगवण चौकात राष्ट्रवादीने नुकतेच जोडो मारो आंदोलन केले होते.

या आंदोलनावेळी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पडळकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. ते बारामतीत आल्यास तोंडाला काळे फासण्याचा इशारा देण्यात आला होता. राष्ट्रवादीच्या आंदोलनानंतर भाजप या प्रकरणी आक्रमक झाली आहे. त्याच जागी आंदोलन करत भाजपने पडळकरांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत राष्ट्रवादीला प्रत्युत्तर दिले. भाजपसोबत राष्ट्रवादी राज्यात सत्तेत असताना बारामतीत या दोन्ही पक्षांची या मुद्द्यावरुन जुंपली आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news