pune st strike : स्वारगेट स्थानकात अव्वाच्या सव्वा भाडे आकारून प्रवाशांची लूट | पुढारी

pune st strike : स्वारगेट स्थानकात अव्वाच्या सव्वा भाडे आकारून प्रवाशांची लूट

पुणे; पुढारी वृत्तसेवा :

एसटीचा संपाचा (pune st strike) फायदा घेतखासगी ट्रॅव्हल्स चालकांच्या एजंटांनी थेट स्वारगेट एसटी स्थानकातच घुसखोरी केली आहे. एसटी स्थानकात घुसून प्रवाशांना घेऊन जात आहेत. प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा दराने भाडे आकारून त्यांची लूट करण्यात येत आहे. प्रवाशांनाही नाईलाजास्तव जादा भाडे द्यावे लागत आहे. त्यामुळे आरटीओने येथे लक्ष देऊन प्रवाशांची लूट थांबवावी, अशी मागणी करण्यात येत आहे. (pune st strike)

सोमवारी सकाळपासून स्वारगेट एसटी स्थानक परिसरात खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांचा धुमाकूळ सुरू आहे. चालकांच्या एजंटांची तर चांगलीच चांदी सुरू आहे. खासगी ट्रॅव्हल्स चालकांचे एजंट सरळ-सरळ स्वारगेट स्थानकात येऊन एसटीचे प्रवासी पळवत आहेत. स्वारगेट एसटी स्थानक परिसराला तर ट्रॅव्हल्सच्या बसेसचा विळखाच पडला आहे.

आरटीओचे पथक स्वारगेट परिसरात गस्तीवर पाठवा

एसटीच्या कर्मचाऱ्यांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे स्वारगेट स्थानकात प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. येथे संप असल्याचे माहित असताना देखील प्रवासी तासनतास थांबत आहेत. प्रवाशांना येथे एकही एसटी बस मिळत नाही. अनेक प्रवासी एसटी स्थानकातून पुन्हा परतत आहे. याचा फायदा ट्रॅव्हल्स चालकांकडून घेतला जात आहे. त्यामुळे आरटीओ प्रशासनाने आपले एक पथक या ठिकाणी पाठवून प्रवाशांची होणारी लूट तात्काळ थांबवावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

 

Back to top button