पुणे : सोमेश्वर कारखान्याच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम जगताप; उपाध्यक्षपदी होळकर  | पुढारी

पुणे : सोमेश्वर कारखान्याच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम जगताप; उपाध्यक्षपदी होळकर 

सोमेश्वरनगर (पुणे) : पुढारी वृत्तसेवा

बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा माजी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांनी अध्यक्षपदाची ‘हॅट्रीक’ साधली आहे. आज (सोमवार) कारखान्याच्या जिजाऊ सभागृहात संचालक मंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुचनेनुसार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी पुरुषोत्तम जगताप यांचे नाव सुचविल्यानंतर त्यांची अध्यक्षपदी निवड झाली. उपाध्यक्षपदी सदोबाचीवाडी येथील आनंदकुमार होळकर यांची निवड झाल्याने कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी केली.

मागील पाच वर्षात कारखाना कर्जमुक्त करण्यात आलेले यश, राज्यात दिलेला उच्चांकी दर, उभारलेले शैक्षणिक संकुल, कामगार आणि सभासदांच्या हितासाठी घेतलेले निर्णय, सध्या सुरु असलेले विस्तारीकरण, निवडणुकीत मिळालेले अभूतपूर्व यश या पुरुषोत्तम जगताप यांच्या जमेच्या बाजू ठरल्या आहे. त्यांनी अध्यक्षपदाची ‘हॅट्रीक’ साधली आहे.

Back to top button