एसटी संप : आज तरी तोडगा निघणार की नाही ? | पुढारी

एसटी संप : आज तरी तोडगा निघणार की नाही ?

मुंबई; पुढारी वृत्तसेवा

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी गेल्या १३ दिवसांपासून एसटीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. आज (ता.०८) राज्यातील सर्वच आगारांमधील एसटी वाहतूक ठप्प झाली आहे. संघर्ष कामगार युनियनने संपूर्ण बंदची हाक दिल्याने राज्यभरात लालपरीची धाव थांबली आहे. परिमाणी दिवाळी सणानिमित्त बाहेरगावी गेलेल्या प्रवाशांचे हाल होत आहेत.

सोमवारी सकाळपासून राज्यात एसटी वाहतूक जवळपास ठप्पच झाली आहे. यामुळे बस स्थानकात प्रवाशी थांबून राहिले आहेत. प्रवाशाला एक तर प्रवास रद्द करावा लागत आहे किंवा खासगी वाहनांनी जावे लागत असल्याचं चित्र दिसत आहे. राज्य शासनाप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांनाही २८ टक्के महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ता अशी मागणी सरकारने मान्य केली आहे.

मात्र, एसटी महामंडळाने समितीच्या मागण्या मान्य करण्यासह वार्षिक वेतनवाढ आणि विलीनीकरणाच्या मागणीबाबत चर्चेचे आश्वासन दिले. काही ठिकाणी कामगारांनी विलीनीकरण आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणीच्या मागणीसाठी संप पुकारला. याला आता राज्यभरातील आगारामधून पाठिंबा मिळत आहे.

सोमवारी सकाळी झालेल्या सुनावणीमध्ये समिती स्थापन करण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला. पण कामगार संप मागे घेण्याच्या मनःस्थितीत नाहीत. तीन वाजेपर्यंत कमिटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. कमिटीची मिटिंग ४ वाजता ४५ नंबर कोर्टाच्या कॅबिनमध्ये होणार आहे . मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव (अर्थ), अतिरिक्त मुख्य सचिव (परिवहन) समितीमध्ये असणार आहेत .त्यानंतर पाच वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. त्याकडे कर्मचाऱ्यांसह प्रवासाचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button