Pune Accident News : पीएमपी बसला अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही

Pune Accident News : पीएमपी बसला अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही

कोथरूड(पुणे) : कर्वे रस्त्यावरील डहाणूकर कॉलनी येथे शुक्रवारी पीएमपी बसचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला. सुदैवाने या अपघात जीवितहानी झाली नाही. मात्र, बस व एका दुचाकीचे नुकसान झाले आहे. एनडीए ते मनपा बस कोथरूड मार्गावरील डहाणूकर कॉलनी येथून जात होती. या बसचे ब्रेक निकामी झाल्याने उतारावर वेग अचानक वाढला.

यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराह निर्माण झाली. मात्र, प्रसंगावधान राखत चालकाने उताराच्या डाव्या बाजूला असलेल्या पदपथावर गाडी नेली. त्या ठिकाणी उभ्या असलेल्या दुचाकीला धक्का लागला. पुढे ही बस इमारतीच्या गेटला धडकल्यानंतर थांबल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. चालक हनुमंत मधुकर आढाव म्हणाले, 'अपघात झाला त्या वेळी या बसमध्ये 20 प्रवासी होते. ब्रेक निकामी झाल्याने उतारवर गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवणे अशक्य झाले. त्यानंतर पदपथावर नेऊन बस थांबली.' अलंकार पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news