घोटावडे फाटा येथे पडळकर यांच्या फोटोची गाढवावरून धिंड | पुढारी

घोटावडे फाटा येथे पडळकर यांच्या फोटोची गाढवावरून धिंड

पौड : पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अपशब्द वापरल्याबद्दल मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या वतीने घोटावडे फाटा या ठिकाणी गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस ’जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. या वेळी आमदार पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत गाढवावरून पडळकर यांच्या प्रतिमेची धिंड काढण्यात आली. मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अंकुश मोरे यांनी या मोर्चाचे आयोजन केले होते.

गोपीचंद पडळकर यांना या वेळी ’मनोरूग्ण’ म्हणून संबोधण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य होण्याचीही पात्रता नव्हती. फुकट आमदारकी मिळालेली आहे. खोटं बोलून प्रकाशझोतात येण्याचा प्रयत्न गोपीचंद पडळकरांचा असतो. मुळशी तालुक्यात पडळकर आले तर त्यांना काळे फासले जाईल, असा इशारा सर्व नेत्यांनी आपल्या भाषणातून दिला. या वेळी ज्येष्ठ नेते राजाभाऊ हगवणे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनिल चांदेरे, तालुकाध्यक्ष अंकुश मोरे, दूध संघाचे संचालक कालिदास गोपालघरे, चंद्रकांत भिंगारे, नियोजन समितीचे माजी सदस्य अमित कंधारे, बाळासाहेब सणस, विनोद कंधारे, भगवान नाकती, लहूशेठ चव्हाण, सुनिल वाडकर, माऊली कांबळे, विजय कानगुडे, विजय येणपुरे, गणेश सुतार, सागर धुमाळ, शेखर शिंदे, महेश मानकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button