नाशिक : वणी पोलिसांची मोठी कारवाई, वाहनासह ३९ लाख ३४ हजाराचा गुटखा जप्त | पुढारी

नाशिक : वणी पोलिसांची मोठी कारवाई, वाहनासह ३९ लाख ३४ हजाराचा गुटखा जप्त

वणी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

वणी पोलीसांनी अवैध गुटखा वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे. वणी पिंपळगाव रस्त्यावर जऊळके येथे पोलिसांनी सापळा रचून १९ लाख २४ हजाराचा गुटखा जप्त केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

संबधित बातमी :

दि.२२ सप्टेंबर रोजी पहाटे साडेचार वाजेच्या दरम्यान वणी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पिंपळगाव कडून वणीच्या दिशेने येणारी आयशर गाडी नं.डी डी ०१जी९०९२ अवैध गुटखा वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी जऊळके येथे सापळा रचला आणि ही गाडी ताब्यात घेतली.

गाडीची तपासणी केली असता त्यात गुटखा लपवून ठेवलेला आढळून आला. या गाडीत राजनिवास आणि विमल गुटखा असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी मांगीलाल हरीसिंग डांगी आणि बने बाबुलाल सिंग यांना अटक करण्यात आली आहे.

या कारवाईत वणी पोलीस ठाण्याचे सपोनि.निलेश बोडखे, पो.उप निरीक्षक महेश शिंदे, पोलीस कर्मचारी निलेश सावकार, युवराज खांडवी, धनंजय शिलावटे, कुणाल मराठे यांनी सहभाग घेतला. या कारवाईमुळे गुटखा तस्करीला आळा बसण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Back to top button