पुणे; पुढारी वृत्तसेवा : हेल्मेट न घालता कार्यालयात प्रवेश देणार्या खासगी संस्था, सरकारी कार्यालये, कंपन्या अशा 1744 आस्थापनांना पुणे आरटीओकडून नोेटिसा देण्यात आल्या आहेत. त्यासोबतच सीसीटीव्हीच्या माध्यमातून या आस्थापनांवर वॉचदेखील ठेवण्यात येत आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून प्रथम नोटीस दिल्या आहेत. मात्र, नियमाचे पालन न केल्यास वाहनचालकांसह आस्थापनांवरदेखील मोटार वाहन कायद्यातील कलम 129 व 194 ड मधील हेल्मेट वापरासंदर्भातील तरतुदीनुसार कारवाई होेणार आहे.