Pune Accident : नगर-कल्याण महामार्गावर पिकअपची दुचाकीला जोरदार धडक; पती ठार, तर पत्नी गंभीर | पुढारी

Pune Accident : नगर-कल्याण महामार्गावर पिकअपची दुचाकीला जोरदार धडक; पती ठार, तर पत्नी गंभीर

ओतूर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : नगर-कल्याण महामार्गावरील ओतूर (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत ढमाले मळा जवळील कृष्णकुंज निवाससमोर कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या पीकअप टेम्पो (एमएच १४ एचयु ३०६९) ने दुचाकी (एमएच ०७ बी २७७२) ला जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार पती पंकज सोपान वामन (वय ३७, रा. काळवाडी पिंपळवंडी, ता. जुन्नर) हे जागीच ठार झाले आहेत. तर त्यांची पत्नी प्रियांका पंकज वामन या गंभीर जखमी झाल्या असल्याची माहिती ओतूर पोलीस सूत्रांनी दिली.

संबंधित बातम्या :

हा भीषण अपघात मंगळवारी (दि. १९) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरेश गेंगजे व शामसुंदर जायभाये हे घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. पीकअप चालक बाबुराव पोपट कुऱ्हाडे (रा. आळे, ता. जुन्नर) यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून याबाबतचा तपास सचिन कांडगे यांचे मार्गदर्शनात हवालदार सुरेश गेंगजे हे करीत आहेत.

कल्याण-नगर महामार्गावर धावणाऱ्या वहानांपैकी पीकअप वाहन चालक हल्ली वेगाची मर्यादा ओलांडून पिकअप गाडी वेगात पळवत असतात. त्यामुळे अलीकडच्या काळात पिकअपच्या अपघातामध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. पीकअप चालकांनी वेग मर्यादेचे पालन करून वाहन चालवावे, असे आवाहन ओतूर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा

नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये आजपासून कांदा लिलाव बंद

New Zealand Earthquake : न्यूझीलंडमध्ये पहाटे भूकंपाचे धक्के

देशात धावणार ‘वंदे भारत’ स्लिपर कोच, मेट्रो

Back to top button