मुंबई-गोवा महामार्गावर दुचाकी अपघातात एक ठार | पुढारी

मुंबई-गोवा महामार्गावर दुचाकी अपघातात एक ठार

रायगड : पुढारी वृत्‍तसेवा वहुर गावाच्या हद्दीमध्ये मोटरसायकल अपघातामध्ये एकजण ठार, एक जखमी झाला. जखमीला महाड ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे.

या घटनेचा अधिक तपास महाड शहर पोलीस करत आहेत. मृत व्यक्‍तीचे नाव रुपेश चव्हाण आहे. जखमी व्यक्‍तीचे नाव हरिश्चंद्र दिवेकर आहे. हे दोघे काळकाइ कोंड तलोशी, तालुका महाड, जिल्हा रायगड येथील रहिवासी आहेत.

हेही वाचा : 

Back to top button