Maharashtra Rain Update : गणेशोत्सवावर पावसाचे सावट; १० दिवसांत रिमझिम सरी | पुढारी

Maharashtra Rain Update : गणेशोत्सवावर पावसाचे सावट; १० दिवसांत रिमझिम सरी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात मंगळवारपासून (दि. 19) गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. या कालावधीत राज्यात पावसाचा जोर फार राहणार नाही. मात्र, अरबी समुद्रातील पश्चिमी वार्‍यांनी वेग घेतल्याने हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
उत्तर भारतात पावसाचा कहर सुरू असून, राजस्थानपासून मध्य प्रदेश व गुजरातपर्यंत मोठा पाऊस सुरू आहे.

सोमवारी राजस्थान, मध्य प्रदेश व गुजरात राज्यात ‘यलो ते रेड अलर्ट’चा इशारा देण्यात आला होता. त्या भागात जोरदार पाऊस सुरू आहे. मात्र, हा पाऊस 20 सप्टेंबरपासून कमी होणार आहे. राज्यात मात्र अरबी समुद्राकडून वाहणारे पश्चिमी वारे पुन्हा जोरदार वाहू लागल्याने 19 ते 29 सप्टेंबरपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

असे आहेत अलर्ट…

कोकण : (19 ते 23 सप्टेंबर) : काही भागांत मुसळधार
मध्य महाराष्ट्र : (19 ते 23 सप्टेंबर) : घाटमाथ्यावर मध्यम
मराठवाडा : (19 ते 23 सप्टेंबर) : काही भागांत मध्यम
विदर्भ : (22 ते 25 सप्टेंबर) : तुरळक भागात मुसळधार

राज्यात पावसाची अशी आहे शक्यता…

मंगळवार : 23 टक्के
बुधवार : 62 टक्के
गुरुवार : 75 टक्के
शुक्रवार : 83 टक्के
शनिवार : 88 टक्के
रविवार : 64 टक्के

24 तासांतील पाऊस… (मि.मी.)

कोकण : मुरबाड 60, अंबरनाथ 48, सुधागड पाली 46, भिवंडी 40, उल्हासनगर 38, वैभववाडी 37, माणगाव 37, माथेरान 35, म्हसळा 34, तलासरी 31, जव्हार 29.
मध्य महाराष्ट्र : वेल्हे 42, त्र्यंबकेश्वर 31, इगतपुरी 25, सुरगणा 23, आजरा 21.
मराठवाडा : औंढा नागनाथ 13.
विदर्भ ः अकोला 20, घाटमाथा : ताम्हिणी 112, दावडी 96, डुंगरवाडी 89, शिरगाव 75 भिरा 56. अंबोणे 55, शिरोटा 24.

हेही वाचा

कोल्हापूर : सीमेवरील उसाची जबाबदारी कुणाची?

Ganeshotsav 2023 : आज बाप्पांचे आगमन

सत्ताधार्‍यांनी आमदारांना तरी विश्वासात घ्यावे : आ. सतेज पाटील

Back to top button