Pune Accident : पुणे-बंगळुरू महामार्गावर विचित्र अपघात; ट्रकची आयशर टेम्पोला धडक, चालक जखमी | पुढारी

Pune Accident : पुणे-बंगळुरू महामार्गावर विचित्र अपघात; ट्रकची आयशर टेम्पोला धडक, चालक जखमी

कात्रज(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर जांभूळवाडी परिसरातील दरी पुलाजवळील इंडियन पेट्रोल पंपासमोर शनिवारी ट्रकची आयशर टेम्पोला धडक बसली. या विवित्र अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जखमी झाले असून, त्यांना नर्‍हे येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तासगावहून राजस्थानला बेदाणा घेवून जाणार्‍या ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याची बाब चालकाच्या लक्षात आली. त्यानंतर त्याने गाडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी हॅण्ड ब्रेकचा वापर केल्याने हा ट्रक रस्त्यावर पूर्णपणे आडवा झाला.

त्यानंतर तो पुढे चाललेल्या आयशर टेम्पोवर आदळल्याने टेम्पोही उलटला. अपघाताची माहिती मिळताच भारती विद्यापीठ वाहतूक पोलिस आणि राष्ट्रीय महामार्ग पेट्रोलिंग वाहन घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही वाहने रस्त्यावर आडवे झाल्याने शिंदेवाडीकडून जुन्या कात्रज बोगदामार्गे वाहतूक वळविण्यात आली. महामार्गावरील दोन्ही ट्रक बाजूला घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत केल्याचे वाहतूक पोलिस निरीक्षक प्रशांत कणसे यांनी सांगितले.

हेही वाचा

कोल्हापूर एनसीसी मुख्यालयात एअरविंग सुरू करण्यास मंजुरी : आ. सतेज पाटील

पत्नीला अक्कल नाही म्हणणे, हा छळ ठरत नाही

आर्थिक संकटातही पाकिस्तानची अण्वस्त्र वाढ

Back to top button