पुण्यातील इंदापूरात राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी; राष्ट्रीय महामार्गावरील गावात झळकले बॅनर | पुढारी

पुण्यातील इंदापूरात राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी; राष्ट्रीय महामार्गावरील गावात झळकले बॅनर

इंदापूर/पळसदेव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापल्याचे आता पाहायला मिळत असून, पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील पळसदेव गावामध्ये सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तशा आशयाचे बॅनर पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पळसदेव गावच्या कमानीवर लावण्यात आले आहेत.

‘एक मराठा लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे’ या मागणीसह पळसदेव येथील मराठा समाजाच्या बांधवांनी आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार पळसदेव येथील मराठा समाजबांधवांनी सर्वच पक्षांतील नेत्यांना गावबंदीचा निर्णय घेतला. हे आंदोलन आरक्षण मिळेपर्यंत सुरू राहणार असून, रात्री तब्बल 10 पर्यंत शेकडो आंदोलकांनी गावातील प्रवेशद्वारावर थांबून गावात येणार्‍या सर्वच राजकीय पक्षांच्या गावात येण्यास विरोध दर्शविला.

जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही पक्षाच्या राजकीय नेत्यांना आम्ही गावात प्रवेश देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. ‘चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष, आता फक्त मराठा आरक्षण लक्ष’ अशा पद्धतीचा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आला आहे.

दरम्यान, पळसदेव गावात गुरुवारी (दि. 14) एका सार्वजनिक कार्यक्रमाचेे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अनेक नेतेमंडळी उपस्थित राहणार होती. मात्र, मराठा समाजाच्या युवकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे या नेत्यांनी संबंधित कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. गावातील परिस्थिती पाहता पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला.

हेही वाचा

पुणे : ‘लव्ह लेटर’ पाठविणारे पोलिस तक्रारीच घेत नाही

Pune Crime News : संतापजनक! भीक मागण्यासाठी 2 हजारांत चिमुकलीचा सौदा

Pune News : महागड्या तपासण्या मोफत कधी ? गरीब रुग्णांचा सवाल

Back to top button