पुणे; पुढारी वृत्तसेवा : नव्याने सुरू होणार्या शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता आणि बुध्दिमापन चाचणी परीक्षा दिलेल्या उमेदवारांना शिक्षण विभागावे पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्र तयार करण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. परंतु त्यास आता मुदतवाढ देण्यात आली असून, उमेदवारांना येत्या 22 सप्टेंबरपर्यंत स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्याची संधी देण्यात आली आहे. जे उमेदवार स्वप्रमाणपत्र पूर्ण करणार नाहीत ते शिक्षक भरतीला मुकणार असल्याचेदेखील शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
संबंधित बातम्या :
शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टलद्वारे शिक्षण सेवक/ शिक्षक पदभरतीसाठी शासनाने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी- 2022 या परीक्षेचे ऑनलाइन पद्धतीने दि. 22 फेब्रुवारी ते 3 मार्च 2023 या कालावधीमध्ये आयोजन केले होते. या चाचणीस 2 लाख 39 हजार 730 उमेदवारांनी नोंदणी केली होती; त्यापैकी 2 लाख 16 हजार 443 उमेदवारांनी प्रत्यक्ष चाचणी दिली.
ही चाचणी दिलेल्या उमेदवारांना 1 ते 15 सप्टेंबरदरम्यान स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी पोर्टलवर सुविधा देण्यात आली; परंतु राज्यातील काही भागामध्ये इंटरनेट सुविधा व्यवस्थितरीत्या सुरू नाही. तसेच 14 सप्टेंबरला पोर्टलवरील स्व-प्रमाणपत्र पूर्ण झालेल्या उमेदवारांची संख्या विचारात घेता, दिलेल्या मुदतीत उर्वरित उमेदवारांना स्वप्रमाणपत्र तयार करता येणे शक्य नाही हे लक्षात घेऊन दि. 22 सप्टेंबरअखेर मुदतवाढ देण्यात आली आहे.
नोंदणी केलेले विद्यार्थी 126453
अपूर्ण अर्जांची संख्या 16235
अर्ज पूर्ण; परंतु सर्टिफाईड नाही 15270
सर्टिफाईड अर्ज 94948
अनसर्टिफाईड अर्ज 684
हेही वाचा